१. पाहिले २ वर्ष व्यवसायातील आपली भागीदारी वाढवत चला, म्हणजे तुमच्या प्रॉफिट मधला काही हिस्सा व्यवसायात नक्की लावत जा.
२. प्रॉडक्ट क्वालिटी व सर्विसेस च्या जोरावर जहिरात करा ना की डिस्काउंट च्या जोरावर.
३. जास्तीत जास्त लोक तुमचा प्रोडक्ट अथवा सर्व्हिसेस दुसऱ्या व्यक्तीला घ्यायला सांगतील अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठेवा.
४. एकाच प्रकारची जहिरात, एकाच प्रकारच्या एरिया मध्ये करणे टाळा, प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण गोष्टी घेउन या.
५. रोजच्या रोज आपल्या व्यवसायात आलेल्या नव्या गोष्टी, नव्या सेवा आणि त्यातून ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकायला विसरू नका.
कारण, जेंव्हा एक संतुष्ट ग्राहक प्रतिक्रिया देतो त्यातून शेकडो लोकांना आपल्या सेवेची लगेच हमी मिळते आणि ती कोणत्याही महागड्या मार्केटिंग पद्धतीपेक्षा जास्त ग्राहक मिळवून देऊ शकते.
धन्यवाद.
व्यवसाय साक्षर व्हा.
आवडल्यास नक्की लाईक | शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
#उद्योगमंत्र#मराठी#उद्योजक#मनोज#इंगळे
श्री. मनोज इंगळे
संस्थापक-उद्योगमंत्र